स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, छ. शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, छ. शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा
महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी व वाढ होण्यासाठी विविध खेळाच्या माध्यमातून युवा पिढीला खेळाकडे आकृष्ट करणे व त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा, छ. शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, भाई नेरुळकर खो-खो स्पर्धा व छ. शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चषक स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू बरोबर खेळण्याची संधी तसेच जवळून कौशल्य पाहण्याची संधी राज्यातील खेळाडूंना मिळत आहे.
लाभार्थी:
कुस्ती, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल खेळाडू
फायदे:
प्रतिभा दाखविण्याची संधी
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.