स्वयंसिध्दा महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम
शहरी भागातील अस्थिर व असुरक्षित जीवनमान लक्षात घेता प्रत्येक महिलेला आपल्या स्वत:च्या संरक्षणासाठी निर्भय, सक्षम, स्वयंसिध्द बनविणे तसेच वंसरक्षणाबाबतची भिती महिलांच्या मनातून घालवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व निर्भय मानसिकता निर्माण करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. खेळाद्वारे सर्वासांठी सुदढता या कार्यक्रमांतर्गत सर्व नागरिकांच्या सुदढतेबरोबरच स्वसरंक्षण ही एक काळाची गरज बनली आहे. सन 2003 पासून शासनाच्या क्रीडा विभागामार्फ़त महिलांसाठी स्वसंरक्षणाची निर्भय योजना राबविण्यात येत आहे.
आजच्या काळात व्यवसायासाठी, नोकरीसाठी, शिक्षणसाठी घरातुन बाहेर पडणाऱ्या महिलांना स्वयंसिध्द बनविणे ही सामाजिक बांधिलकी समोर ठेवुन शासनाने या योजनेची आखणी केली आहे. सर्व महिलांना आत्मविश्वासपुर्ण स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे हे जरुरीचे झाले आहे. या करिता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ज्युदो / तायक्वांदो खेळातील तज्ञ व्यक्तींशी विचारविनिमय करुन तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार महिला वर्गाला स्वंसंरक्षणाचे डावपेच (ज्युदो, तायक्वादो, मार्शलआर्ट, लाठीकाठी), शारीरिक तंदुरूस्तीचे व्यायाम प्रकार, योगासन, हास्यउपचार पध्दती, स्वयंरोजगार इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.
तसेच स्त्रियांच्या सर्वागिण विकासासाठी शरीररचना, स्नायु दुखापती, खेळाडूचे मानसिक व शारीरिक पुनवर्सन, महिलांचे आरोग्य, आहार, मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय मार्गदर्शन, स्वंयरोजगार, आणि करिअर मार्गदर्शन, होम मॅनेजमेंट, फायरब्रिगेंड ट्रेनिंग-संकल्पना, प्रात्यक्षिके, ट्रॅफिक-नियम-माहिती -प्रात्यक्षिके, महिलांच्या समस्या व निराकरण व महिला विषयक कायदयातील तरतूदी इ. विषयावर तज्ञामार्फत व्याख्यान दिले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गांवातील महिला स्वयंसिध्द व्हावी, या अनुषंगाने संचालनालयस्तरावर स्वयंसिध्दा प्रशिक्षकांची अनेक जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर शिबीरांचे आयोजन करण्यात आले.
लाभार्थी:
महिला
फायदे:
ज्युदो / तायक्वांदो खेळातील तज्ञ व्यक्तींशी विचारविनिमय करुन तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार महिला वर्गाला स्वंसंरक्षणाचे डावपेच (ज्युदो, तायक्वादो, मार्शलआर्ट,लाठीकाठी,) शारीरिक तंदुरूस्तीचे व्यायाम प्रकार, योगासन, हास्यउपचार पध्दती, स्वयंरोजगार इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.