राष्ट्रीय छात्र सेना
सन 1948-49 मध्ये देशव्यापी स्वरुपात राष्ट्रीय छात्र सेना दलाची स्थापना शिक्षण संस्थेमधील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी झाली. महाराष्ट्रात सन 1972-73 च्या शैक्षणिक वर्षापासून सुरु झालेल्या 10 + 2 + 3 ह्या बदललेल्या शिक्षण पध्दतीनुसार राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालय स्तरावरील अभ्यासक्रमात ऐंच्छिक विषयाखालील एक उपक्रम म्हणून अंतर्भाव करण्यात आला आहे.
शिक्षण पध्दतीचा एक घटक म्हणून राष्ट्रीय छात्र सेना हा केंद्र सरकार तथा राज्य सरकार हयांना जोडणारा एक जबाबदार दुवा म्हणून कार्य करते. सेना दलातील ब्रिगेडियर हया हुद्याचा अधिकारी उपमहासंचालक राष्ट्रीय छात्र सेना, मुंबई, हे केंद्रशासन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय आणि प्रशिक्षणे व शिबीरे हा विभाग सांभाळतात. विभागीय गटप्रमुख व समादेशक अधिकारी सुध्दा सेना दलातील अधिकारी असतात. सेना दलातील अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते, शस्त्रांची किंमत, दारुगोळा आणि इतर साहित्य यांचा खर्च केंद्र सरकार करते.
राज्यात एकूण 66 राष्ट्रीय छात्र सेना कार्यालये असून त्या कार्यालयातील नागरी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, छात्रांचे प्रशिक्षण व शिबीरे, प्रजासत्ताक रॅली सोहळा, अल्पोपहार, धुलाई व चकाकी भत्ता, मानधन भत्ता, कार्यालयीन नियमित खर्च इत्यादिवरील खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येतो.
राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत 7 गटप्रमुख, गटमुख्यालय व 59 समादेशक अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत, या कार्यालयांमध्ये वर्ग 3 व वर्ग 4 या संवर्गातील एकूण 1016 पदे मंजूर आहेत.
लाभार्थी:
माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमधील स्वयंसेवक विद्यार्थी
फायदे:
कॅडेट्सना लहान शस्त्रे आणि कवायतींचे लष्करी प्रशिक्षण देणे.
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.