बंद

    राज्याचे युवा धोरण 2012

    • तारीख : 28/04/2014 -

    देशाचे युवा धोरण सन 2003 मध्ये जाहिर करण्यात आले आहे. राज्यातील 13 ते 35 वयोगटातील युवा लोकसंख्येचा विचार करता देशाच्या युवा धोरणाच्या अनुषंगाने राज्याचे स्वतंत्र युवा धोरण तयार झाल्यास त्याव्दारे युवा कल्याणाच्या विविध योजना राबविणे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकंदरीतच राज्याच्या युवक कल्याण क्षेत्राचा आढावा घेऊन नवीन युवा धोरण ठरविण्याकरीता मा. मंत्री (क्रीडा व युवककल्याण) अध्यक्ष व मा. राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण यांच्या उपाध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 20 फेब्रुवारी 2010 च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. या समितीत 29 सदस्यांचां अंतर्भाव होता.

    देशाचे युवा धोरण 2003 व त्यानतंर युवककल्याण क्षेत्रात झालेले विविध बदल विचारात घेऊन राज्याचे नवीन युवा धोरण ठरविण्याकरीता सहाय्यभूत होतील अशा सर्वकर्ष शिफारशी करणे अशी या समितीची कार्यकक्षा होती. दि. 14 जुन 2012 रोजी महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण-2012 जाहीर झाले असुन, शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यानुषांगीक 6 योजनांचे शासन निर्णय प्राप्त झाले असून, त्या योजना खालील प्रमाणे.

    नविन सुधारित महाराष्ट्राचे युवा धोरण: महाराष्ट्राचे युवा धोरण हे सन 2012 नुसार मान्यता प्रदान केल्यानंतर सदर धोरणाचा कालावधी 10 वर्षे निश्चित केलेला होता, सदर युवा धोरणास 10 वर्ष पूर्ण झाल्याने आढावा घेऊन नविन सुधारित महाराष्ट्राचे युवा धोरण तयार करणेकरिता समिती गठीत करण्यासाठी शासनास दि.२८मे २०२५ च्या शासन निर्णयान्वये युवा धोरण समिती गठीत उभारण्यात आली.

    1. युवा वसतीगृहाची स्थापना
    2. युवा महोत्सवाचे आयोजन
    3. युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
    4. राज्य युवा विकास निधीस अनुदान
    5. राज्य युवा प्रशिक्षण केंद्रांची स्थापना
    6. युवा पुरस्कार

    लाभार्थी:

    युवा

    फायदे:

    युवा कल्याण

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.