महाराष्ट्र राज्य स्काऊट व गाईड योजना (बालवीर व वीरबाला)
माध्यमिक शाळांसाठी सन 1972-73 या सालापासून 8 वी ते 10 वी इयत्तेसाठी बालवीर व वीरबाला हा विषय ऐच्छिक विषय म्हणून सुरु करण्यात आलेला आहे. बालवीर व वीरबाला ही योजना महाराष्ट्र राज्य स्काऊट व गाईड, मुंबई या संस्थेमार्फत राज्यामध्ये राबविली जाते.
सदर योजनेमध्ये 297 कर्मचारी कार्यरत असून राज्यातील 36 जिल्हयांच्या ठिकाणी 42 कार्यालये आहेत. संबंधित संस्थेच्या नियंत्रणाखाली जिल्हा कार्यालयांमार्फत सदर योजना प्रभावीपणे राबविली जाते.
मुलामुलींमध्ये चारित्र्याचा विकास करणे, त्यांच्या शारीरिक, मानसिक, नैतिक व अध्यात्मिक शक्तींचा विकास करणे व समाजात त्यांच्या सेवेचा उपयोग व्हावा यासाठी कायद्याने वागणारे चांगले नागरीक निर्माण करणे, चारित्र्यवान, सेवाभावी, स्वावलंबी, नम्र व विनयशिल व राष्ट्रप्रेमी असे चांगले नागरीक घडविण्याचे कार्य केले जाते.
लाभार्थी:
विद्यार्थी
फायदे:
मुला-मुलींमध्ये चारित्र्य विकसित करणे, त्यांची शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढवणे आणि कायद्याचे पालन करणारे चांगले नागरिक तयार करणे, जेणेकरून ते समाजाची सेवा करू शकतील हे सुनिश्चित करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.