बंद

    महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदे मार्फत क्रीडा संस्थांना आर्थिक सहाय्य.

    • तारीख : 20/07/1997 -

    महाराष्ट्र राज्यात क्रीडा व खेळांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या एकविध खेळाच्या जिल्हा व राज्य संघटना, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे तसेच इतर कार्यक्रमाबरोबर क्रीडा विकासाचे कार्य करणा-या संस्थांना महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य देण्यात येते. शासनाने मान्यता दिलेल्या खेळांच्या जिल्हा, राज्य संघटनांना तसेच क्रीडा संस्थांना खालील बाबींकरिता अनुदान देण्यात येते.

    लाभ

    क्रीडा संस्थांना देण्यात येणारे अनुदान
    अनुदानाचा प्रकार वर्णन
    जिल्हा संघटना मान्यताप्राप्त जिल्हा क्रीडा संघटनांना विविध स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे व इतर क्रीडा उपक्रमासाठी अनुदान
    राज्य संघटना राज्यस्तरावरील क्रीडा संघटनांना क्रीडा विकास, प्रशिक्षण सुविधा व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागासाठी अनुदान
    क्रीडा संस्था / मंडळे शासनमान्य क्रीडा संस्था व क्रीडा मंडळांना क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी आणि क्रीडा उपक्रम राबवण्यासाठी सहाय्य
    इतर कार्यक्रम क्रीडा विकासाशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आयोजन व प्रशिक्षण उपक्रमांसाठी अनुदान

    लाभार्थी:

    राज्य, जिल्हा, स्थानिक संघटना

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे