महाराष्ट्र राज्य ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धा
राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरिता महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या मार्फत राज्यात “महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा” चे आयोजन दि.2 ते 12 जानेवारी 2023 रोजी पुणे, बारामती, मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, सांगली व अमरावती येथे करण्यात आले.
सदर स्पर्धेकरिता शासनाकडून ₹19,07,94,600/- निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेत 7444 खेळाडुंनी ३७ खेळ प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेनिमित्त दि.04 व 05 जानेवारी 2023 रोजी मुख्य क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन किल्ले रायगड येथे करण्यात आलेले होते. मुख्य क्रीडा ज्योत रॅली ही किल्ले रायगड येथून प्रारंभ होऊन पुणे येथे एस.एस.पी.एम. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रथम शिल्प पर्यंत करण्यात आलेले होते.
लाभार्थी:
क्रीडा क्षेत्र
फायदे:
खेळाडूंच्या कौशल्य प्रदर्शनासाठी व्यासपीठ
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.