बंद

    खेलो इंडिया

    • तारीख : 01/04/2019 -

    आगामी काळात ऑलिंपिक, आशियाई तसेच राष्ट्रकुल यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने, गुणवंत व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, खेळाडूंना ऑलिंपिक, आशियाई तसेच राष्ट्रकुल यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाचा स्तर अनुभवता यावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे प्रतिवर्षी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. यामधिल प्रतिभावंत खेळाडूंना केंद्र शासनाव्दारे शिष्यवृत्ती देण्यात येते.

    या योजनेतंर्गत खेलो इंडिया स्पर्धेमधून दरवर्षी प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना अद्यावत प्रशिक्षणासाठी केंद्र शासनामार्फत रु. 5.00 लक्ष प्रतिवर्षी प्रमाणे पुढील आठ वर्षाकरीता खर्च केला जाणार आहे.

    लाभार्थी:

    खेळाडू

    फायदे:

    पदक विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे रु.5.00 लक्ष, 3.00 लक्ष, व 2.00 लक्ष इतक्या रोख रक्कमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.