बंद

    क्रीडा नैपुण्य शिष्यवृत्या

    • तारीख : 04/07/2013 -

    राज्यात तालुका ते राष्ट्रीय स्तरावर भारतीय खेल महासंघ तसेच भारतीय क्रीडा प्राधिक्ररण पुरस्कृत शालेय, महिला, क्रीडा स्पर्धाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत प्रतिवर्षी करण्यात येते. महाराष्ट्र राज्य हे गत पाच वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत व्दितीय स्थानावर आहे.

    राज्यातील खेळाडू करीत असलेल्या क्रीडा कामगिरिची दखल घेउन खालील प्रमाणॆ शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्राविण्य संपादन व सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना मानधन देण्याचा महत्वपुर्ण निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.अताप्र-1008/ (प्र.क्र.428/08)/क्रीयुसे-2, दि.22 मार्च 2010 अन्वये घेतला आहे. वित्तिय वर्षात एकूण सुमारे 2300 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

    लाभ

    शालेय क्रीडा शिष्यवृत्ती तपशील
    प्राविण्य राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती रक्कम आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम
    प्रथम क्रमांक 11,250/- 30,000/-
    द्वितीय क्रमांक 8,950/- 22,500/-
    तृतीय क्रमांक 6,750/- 15,000/-
    सहभाग 3,750/- 11,250/-

    लाभार्थी:

    राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.