ऑलिम्पिक भवन व ऑलिंपिक म्युझियम उभारणी
महाराष्ट्रामधील सर्व एकविध खेळ संघटना यांच्या माध्यमातुन खेळांचा विकास साधण्यासाठी एकत्रीत व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ऑलिम्पिक भवन उभारणीचे प्रस्तावीत आहे. यासाठी शासनाने शासन निर्णाय क्र. क्रीडासू-3020/प्र.क्र. 35/क्रीयुसे-१ दिनांक 27 मार्च 2020 अन्वये शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळूंगे बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस असलेली 2.50 एकर इतकी जागा ऑलिम्पिक भवन उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. सदर इमारातीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास बांधकाम एजन्सी म्हणुन नियुक्त करण्याबाबत शासनस्तरावरुन प्रस्तावीत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. ऑलिम्पिक भवनच्या उभारणीसाठी एकूण रु.44.70 कोटी इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी रु.44.70 कोटी इतका निधी खालील शासन निर्णयांद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
लाभार्थी:
क्रीडा क्षेत्र
फायदे:
क्रीडा विकास
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे