इ 11 वी प्रवेशासाठी खेळाडूंना 3 टक्के आरक्षण
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.एचएससी-1707/(222/07)/उमाशि-1, दि.25 मार्च 2010, अन्वये भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत विभागिय क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूनां, राज्य -राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना तसेच एकविध खेळांच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूनां व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूनां इयत्ता 11 वी प्रवेशासाठी 3 टक्के जागा राखून ठेवण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली होती. तथापि दि. 20 डिसेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार अधिकृत राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते व आतंरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूनां राखीव क्रीडा कोटयातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
लाभार्थी:
विद्यार्थी खेळाडू
फायदे:
अकरावी प्रवेशासाठी ३% आरक्षण
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.