बंद

    आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र ची स्थापना

    • तारीख : 18/11/1995 -

    राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा ” आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र ” स्थापनेचा उद्देश आहे.

    क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र अधिनियम 2020 दि.28/12/2020 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.

    मान्यता प्राप्त विद्यापीठ – विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांनी दि.03/08/2021 रोजीच्या पत्रान्वये मान्यता प्राप्त विद्यापीठ यादीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र यांचा समावेश झालेला आहे.

    नामकरण मान्यता – विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांचेकडे दि.24/09/2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र मध्ये नवीन अभ्यासक्रम बाबत Nomenclature मिळण्यासाठी सादरीकरण करण्यात आलेले होते. यास विद्यापीठ अनुदान आयोगाने दि.03/03/2022 रोजीच्या पत्रान्वये बॅचलर स्पोर्टस सायन्स व बॅचलर स्पोर्टस मॅनेंजमेट या अभ्यासक्रमास Nomenclature मान्यता प्रदान केली आहे.

    प्रथम टप्यातील अभ्यासक्रम – प्रथम टप्यात खालील अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

    अभ्यासक्रमाची माहिती
    अ.क्र. अभ्यासक्रमाचे नाव कालावधी प्रशिक्षणार्थी संख्या
    1 बॅचलर स्पोर्ट्स सायन्स 3 वर्ष 60
    2 बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट 3 वर्ष 60

    विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार ५ वर्षांकरीता २१३ पदे यापैकी पहिल्या वर्षी १३३ पदे (नियमित वेतनश्रेणीतील १०० पदे व ठोक वेतनावरील ३३ पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. व्यवस्थापनासाठी अधिकारी व कर्मचारी – प्रथम टप्यात बाह्यस्त्रोतातून घेण्याबाबत शासनास दि. 28.7.2021 रोजी प्रस्ताव सादर केलेला आहे. यामध्ये विद्यापीठासाठी डिन, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लेखाधिकारी, लिपिक, इतर कर्मचारी अशा 39 पदांचा समावेश आहे.

    लाभार्थी:

    क्रीडा क्षेत्र

    फायदे:

    क्रीडा विकास

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.