बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    क्रीडा विभागाची स्थापना राज्याच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन करण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने, सन १९९६, सन २००१ व सन २०१२ या वर्षांमध्ये राज्याच्या स्वतंत्र क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. राज्यात क्रीडा वातावरण निर्मिती सोबतच राज्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे प्रमुख कार्य क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे.

    क्रीडा विषयक पायाभूत सुविधांची निर्मिती, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून ज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षणाची संधी, तालुका स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजनाच्या माध्यमातून खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी, विशेष कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना इ.१० वी व इ.१२ वी मध्ये सवलत गुण व शासकीय/निमशासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण, राज्यातील क्रीडापटूंना अद्यावत प्रशिक्षणासाठी व विदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचा नावलौकिक करणाऱ्या राज्यातील खेळाडूंना शासकीय नोकरीत थेट नियुक्तीची सुविधा व या खेळाडूंना रोख पारितोषिके व पुरस्कार अशा अनेकविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना उज्वल कामगिरी करण्यासाठी प्रेरीत करण्यात येत आहे.

    क्रीडा प्रबोधिनी सारख्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेऊन त्यांचे अंगी असलेल्या क्रीडागुणांना पैलू पाडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

    राज्यातील प्रत्येक विभागीय मुख्यालयाचे ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल, प्रत्येक जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल तर प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्याची महत्वाकांक्षी योजना सध्या कार्यरत.

    शैक्षणिक संस्थांनी क्रीडा या विषयास अधिक चालना द्यावी या उद्देशाने या संस्थांना त्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या आधारे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची योजना, शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या खेळाडूंची सोय व्हावी या उद्देशाने क्रीडांगण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजना कार्यरत.

    युवक कल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थांना विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच या क्षेत्रात कार्यरत युवा व युवा संस्थांना जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार.