क्रीडा संकुलांची देखभाल
महाराष्ट्र राज्याची क्रीडा धोरण 2001 अंतर्गत खेळाच्या अद्ययावत सुविधा असणारे विभागीय, जिल्हा, तालुका क्रीडा संकुलाची महत्वपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. संकुलाच्या बांधकामासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येते. तथापि संकुलाची देखभाल व दुरुस्ती तसेच दैनंदिन खर्च इ साठी आथिर्क सहाय्य करणे आवश्यक असल्याने सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष कार्य विभाग शासन निर्णय क्र. राक्रीधो 2003/प्रक्र.11/क्रीयुसे-1 दि. 26 मार्च 2003 अन्वये संकुलाचा आवर्ती खर्च (देखभाल, दुरुस्ती व वेतन भत्ते इ.) साठी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
लाभ
प्रकार | आवर्ती खर्च (देखभाल, दुरुस्ती व वेतन भत्ते इ.) | अनुदान रक्कम |
---|---|---|
तालुका क्रीडा संकुल | आवर्ती खर्च (देखभाल, दुरुस्ती व वेतन भत्ते इ.) | ₹ 3.00 लक्ष प्रति वर्ष |
जिल्हा क्रीडा संकुल | आवर्ती खर्च (देखभाल, दुरुस्ती व वेतन भत्ते इ.) | ₹ 10.00 लक्ष प्रथम वर्ष |
₹ 7.50 लक्ष दुसरे वर्ष | ||
₹ 5.00 लक्ष तिसरे वर्ष | ||
विभागीय क्रीडा संकुल | आवर्ती खर्च (देखभाल, दुरुस्ती व वेतन भत्ते इ.) | ₹ 15.00 लक्ष प्रथम वर्ष |
₹ 12.50 लक्ष दुसरे वर्ष | ||
₹ 10.00 लक्ष तिसरे वर्ष |
लाभार्थी:
तालुका, जिल्हा, विभागीय क्रीडा संकुल
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.