क्रीडा प्रबोधिनी
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्याव0त क्रीडा सुविधा पूरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने राज्यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर, गडचिरोली, अकोला, औरंगाबाद, प्रवरानगर (जि.अहमदनगर), सांगली अशा ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती.
तथापि सांगली व प्रवरानगर या क्रीडा प्रबोधिनी सन २०१९ मध्ये शासनाने बंद केल्यामुळे व गडचिरोली मधील प्रशिक्षणार्थी यांना नागपूर येथे वर्ग केल्यामुळे सध्या 8 क्रीडा प्रबोधिनीमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफिटंग, ट्रायथलॉन, सायकलिंग व बॉक्सींग अशा 16 क्रीडा प्रकारात मार्गदर्शन केले जाते.
सध्या सन 2025-26 मध्ये 8 क्रीडा प्रबोधिनीमध्ये एकूण 492 प्रशिक्षणार्थी ( निवासी: 278 मुले व 157 मुली एकूण 428 व अनिवासी: 29 मुले व 28 मुली असे एकूण 57) प्रशिक्षण घेत आहेत.
- सरळ प्रवेश प्रक्रिया: सरळ प्रवेश प्रक्रिये अंतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये असलेल्या खेळांमध्ये राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडूंना प्रवेश देण्यात येतो.
- खेळनिहाय कौशल्य चाचणी: खेळनिहाय कौशल्य चाचणीप्रवेश प्रक्रिये अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी मध्ये असलेल्या खेळांमध्ये राज्यस्तरावर व सहभागी झालेल्या खेळाडूंची कौशल्य चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश देण्यात येतो.
पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठ हे मध्यवर्ती केंद्र स्थापन करुन पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीसाठी शासनाने स्वतंत्र शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थीसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्वतंत्र शाळा सुरु असुन सदरची शाळा ही सेमी इंग्रजी व मराठी माध्यमात इयत्ता 1 ते 12 वी या वर्गापर्यंत 100 टक्के अनुदान तत्वावर सुरु आहे. शाळेसाठी स्वतंत्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
लाभार्थी:
विद्यार्थी खेळाडू
फायदे:
प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्याव0त क्रीडा सुविधा पूरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या व क्रीडा संस्कृती रुजविणे
अर्ज कसा करावा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.