बंद

    राज्य क्रीडा विकास निधी स्थापना

    • तारीख : 03/09/2003 -

    क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन राज्यामध्ये परिणामकारक रित्या करण्याच्या दृष्टीने व राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करणे, दर्जेदार खेळाडूंना परदेशी क्रीडा मार्गदर्शकाची सेवा उपलब्ध करुन देणे, नावाजलेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य करणे, काही गुणवान खेळाडू व संघ दत्तक घेऊन त्यांच्याव्दारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू घडविणे व क्रीडा विकासामध्ये शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, औद्योगिक व वाणिज्यीक प्रतिष्ठाणे, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग करणे.

    शासन निर्णय दि. ६ सप्टेंबर २०२१ नुसार राज्य क्रीडा विकास निधी अंतर्गत राज्य शासनाचा प्रतिवर्षी रु. 50.00 लाख व विविध औद्योगिक प्रतिष्ठाणे वा वाणिज्यीक प्रतिष्ठाणातर्फे देण्यात येणा-या देणग्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकेमार्फत जिल्हा क्रीडा विकास निधीमध्ये जमा होणा-या रकमेपैकी 40 टक्के रक्कम, जिल्हा क्रीडा विकास निधीमध्ये शैक्षणिक संस्थांकडून जमा होणा-या निधीपैकी 40 टक्के रक्कम, प्रदर्शनीय सामने, सांस्कृतिक कार्यक्रम इ. उपक्रमांमधून जमा होणारा निधी इ. चा समावेश राज्य क्रीडा विकास निधीमध्ये करण्यात आलेला आहे.

    लाभार्थी:

    खेळाडू, क्रीडा विकासामध्ये शासकीय संस्था, निमशासकीय संस्था

    फायदे:

    राज्यात क्रीडा संस्कृती वाढवणे आणि प्रोत्साहन देणे, क्रीडा सुविधा निर्माण करणे, दर्जेदार खेळाडूंना परदेशी क्रीडा प्रशिक्षकांच्या सेवा प्रदान करणे, प्रसिद्ध खेळाडू आणि क्रीडा संघटनांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.