बंद

    रार्ष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द खेळाडूनां मानधन

    • तारीख : 01/04/2014 -

    राज्याचे नाव राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केलेल्या खेळाडूंना वृध्दापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे या करीता मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे. सुधारीत मानधन 1 एप्रिल 2010 पासुन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. महाराष्ट्र केसरी हा किताब प्राप्त करणा-या कुस्तीगीराचा समावेश वयोवृध्द खेळाडूच्या मानधन योजनेत करण्याचा महत्वपुर्ण निर्णय दि. 6 मार्च 2010 रोजी शासनाने घेतलेला आहे.

    04 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे मानधनात वाढ करण्यात आलेली आहे.

    लाभ

    वयोवृद्ध खेळाडू मानधन तपशील
    स्पर्धेचा स्तर मानधन सुधारित मानधन
    राष्ट्रीय स्तर वयोवृद्ध खेळाडू रु. 2,500/- रु. 7,500/-
    आंतरराष्ट्रीय स्तर वयोवृद्ध खेळाडू (ऑलिंपिक/जागतिक कुस्ती स्पर्धा) रु. 6,000/- रु. 15,000/-
    आंतरराष्ट्रीय स्तर वयोवृद्ध खेळाडू (आशियाई/एशियन चॅम्पियनशीप/राष्ट्रकुल व इतर स्पर्धा) रु. 4,000/- रु. 10,000/-
    हिंदकेसरी, रस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी किताबप्राप्त कुस्तीगीर / अर्जुन पुरस्कार रु. 6,000/- रु. 15,000/-

    लाभार्थी:

    राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर वयोवृध्द खेळाडू, हिंदकेसरी, रुस्तमे-हिंद, महान भार केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी किताबप्राप्त कुस्तीगीर / अर्जून पुरस्कार

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.