बंद

    कुस्ती कला विकासासाठी आर्थिक मदत

    • तारीख : 21/12/2012 -

    राज्यातील कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी तसेच कुस्तीगीरांच्या गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मानधन देण्याची योजना राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमार्फत आयोजित राज्यस्तर कुस्ती अधिवेशनातील माती, गादी, कुमार गट (उदयोन्मुख), ग्रीको रोमन वरिष्ठ गट व महिला कुस्तीगीर असे एकूण पाच विभागात विविध 10 वजनगटातील प्राविण्य प्राप्त कुस्तीगीरांना गटनिहाय मानधन सुधारित दराने संदर्भिय शासन निर्णयान्वये देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

    लाभ

    राज्यस्तरीय कुस्ती मानधन तपशील
    अ.क्र. प्रकार प्रथम द्वितीय तृतीय तृतीय
    1 वरिष्ठ गट (फ्रीस्टाईल) गादी विभाग 60,000/- 55,000/- 50,000/- 50,000/-
    2 वरिष्ठ गट (फ्रीस्टाईल) माती विभाग 60,000/- 55,000/- 50,000/- 50,000/-
    3 उदयोन्मुख (कुमार गट) 50,000/- 36,000/- 24,000/- 24,000/-
    4 ग्रीको रोमन वरिष्ठ गट 60,000/- 50,000/- 36,000/- 36,000/-
    5 महिला 60,000/- 50,000/- 36,000/- 36,000/-

    लाभार्थी:

    कुस्तीगीर

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.