बंद

    जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना

    • तारीख : 21/03/2009 -

    राज्यातील प्रत्येक जिल्हयांत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करुन या केंद्राचे ठिकाणी क्रीडा प्रशिक्षणाच्या अदयावत सुविधा उपलब्ध करुन घेऊन या सुविधांच्या माध्यमातून जिल्हयातील खेळाडूनां नियमित स्वरुपात क्रीडा प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील ज्या जिल्हयात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केद्र स्थापन होण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे असे केद्र अनुदानास पात्र समजण्यात येईल. मान्यता प्राप्त जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा क्रीडा परिषद यांचे कडे अर्ज सादर करावा त्यानीं सदर अर्ज आयुक्त क्रीडा व युवकसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे मंजूरीसाठी सादर करावा.

    जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य व क्रीडा प्रशिक्षण उपकरणे, खेळाडूनां ट्रॅकसूट व गणवेश, अंशकलीन मैदान सेवकाचे मानधन, क्रीडा विषयक वाड:मय, सी.डी.पुस्तके, नियतकालीके, मासिके इ. कार्यालयीन/सादील खर्च, प्रशिक्षकाचां प्रवास खर्च, क्रीडांगण देखभाल व दुरुस्ती, चर्चासत्र/परिसवाद/उजळणी वर्ग (वर्षातून किमान दोन वेळा) समुपदेशन, प्रशिक्षण केंद्राच्या प्रसिध्दीसाठी ब्राउचर तयार करणे, प्लेक्स बोर्ड, पोस्टर्स, स्थानिक वृत्तपत्र/केबल वाहिनी व प्रशिक्षण शिबीर इ. करिता दरवर्षी प्रति जिल्हा रु.14,48,500/- इतके अनुदान देण्यात येईल.

    लाभार्थी:

    खेळाडू

    फायदे:

    या केंद्रांमध्ये आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील खेळाडूंना या सुविधांद्वारे नियमित क्रीडा प्रशिक्षण दिले जाईल.

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.