बंद

    क्रीडा गुण सवलत

    • तारीख : 21/04/2015 -

    इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परिक्षेस बसलेल्या व अधिकृत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंना दि.21 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार फक्त 25 गुण पर्यंतची सवलत देण्यात येत होती.

    तथापि शासनाने दि.20 डिसेंबर 2018 व 25 जानेवारी 2019 च्या सुधारीत शासन निर्णयानुसार इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शिकत असलेल्या व जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्पर्धेत सहभगी झालेल्या खेळाडूंना खालीलप्रमाणे सुधारीत गुण सवलत देणेचा शासनाने निर्णय घेतला आहे.

    लाभ

    गुण सवलत

    1. अधिकृत आतंरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग – 25 गुण
    2. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग – 15 गुण व प्राविण्य – 20 गुण
    3. अधिकृत राज्यस्तरीय स्पर्धा सहभाग – 10 गुण व प्राविण्य – 15 गुण
    4. अधिकृत विभाग स्तर स्पर्धा सहभाग – 5 गुण व प्राविण्य – 10 गुण
    5. अधिकृत जिल्हा स्तर स्पर्धा प्राविण्य – 5 गुण व सहभाग – 0 गुण

    लाभार्थी:

    खेळाडू

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.