बंद

    शासन सेवेत 5 टक्के आरक्षण:

    • तारीख : 30/04/2005 -

    खेळाडूंना नोकरीमध्ये आरक्षण असावे याकरीता शासनाने ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. राज्य, राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्‍या खेळाडूंना शासन सेवेत 5 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

    शासनाच्या विविध विभागात, शासनाच्या मालकीच्या व नियंत्रणाखाली असलेल्या महामंडळात, स्थनिक प्राधिकरणात व विविध स्वरुपात शासकीय सवलती प्राप्त केलेल्या संस्थांमध्ये राज्यातील अत्त्युच्य गुणवत्ताप्राप्त खेळाडूंसाठी नोक-यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.राक्रीधो-2002/प्र.क्र.68/ क्रीयुसे-2, दि.30 एप्रिल, 2005, 21 जून, 2006 व दि.18 नोव्हेंबर, 2006 अन्वये घेतला आहे.

    आजतागायत शासना मार्फत ५ % खेळाडू आरक्षणा अंतर्गत संचालनालयामार्फत दि. 30 एप्रील, 2005 च्या शासन निर्णयान्वये एकुण ४९४९ (चार हजार नऊशे एकोणपन्नास) खेळाडूंना विविध शासकीय कार्यालयात शासकीय नोकरीचा लाभ देण्यात आलेला आहे. ज्यामधे गट अ, ब, क, ड वर्गाच्या नोकऱ्‍यांचा समावेश आहे.

    लाभार्थी:

    राज्य, राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू

    फायदे:

    शासन सेवेत 5 टक्के आरक्षण

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.